हा लेख मुळात कोणाचा आहे ते माहित नाहि, तरी उत्तम लेख असल्याने व समाजातील सर्व लोकांनी वाचावा असा असल्याने मीत ो इथे ठेवत आहे. मुळ लेखक समजल्यास बरे होईल.
--------------------------------------------------------------------
कोल्हापुरचे शाहूमहाराज यांच्या कारकिर्दित सुरुवातीलाच कार्तिकस्नानाचे वेळी राजवाड्यातच एका मूर्ख चारित्र्यहिन ब्राह्मणाने - राजोपाध्ये नव्हेत - स्वत: अंघोळ न करताच मंत्र सांगण्याचे ठरवले यावरुन वेदोक्ताचा वाद दिवाळी १९०१ च्या सुमारास निर्माण झाला. कोल्हापुरच्या ब्राह्मणांनीही या मूर्ख ब्राह्मणाच्या गाढवपणाचा निषेधच केला. पण संस्थानचे रेव्हेन्यु अधिकारी सत्यशोधक भास्करराव जाधव यांनी पुढे हा वाद निर्माण केला व वाढवला.स्वत: शाहू राजांना वैदिक धर्म आणि स्थूल स्वरुपाची समाजरचना मान्य होती का नाही? त्यांचे एक पत्र यावर प्रकाश टाकते. कोल्हापुरच्या विद्याविलास च्या संपादकांना लिहिलेले हे पत्र," माझ्या मतासंबंधि बराच गैर्समज करण्यात येत आहे म्हणून माझे मत जनतेपुढे मांडण्याकरता पाठवत आहे.सत्यशोधक, समाजिस्टांचा हलल माझेवर का? ज्याप्रमाणे ख्रिस्त ,बुद्ध ,थिऑसफी इ. पंथांची काही तत्वे मला मान्य आहेत त्याप्रमाणे सत्यशोधक समाजाची काही तत्वे मला मान्य आहेत. मी सत्यसमाजिस्ट कधीही नव्हतो व नाही. हुबळीस ब्राह्मणेतर समाजाअची बैठक झाली तेव्हा तेथील सत्यशोधक समाजाने मला पानसुपारीस बोलावले असता मी इतर संस्थांना जसा पाहुणा म्हणून तसा येईल असे सांगितले . मग मला सत्यशोधक का म्हणवले जाते? मला वेद मान्य असून ,मी वेदास चिकटून रहाणारा आहे असे असता माझ्यावर हल्ला का? कळावे.शाहू छत्रपतीमुंबई , ता २३ मार्च २/१९२१एवढे स्वच्छ विचार असणारा हा राजा या वेदोक्त वादात कसा फसला वा इंग्रजांच्या राजकारणाने फसून व काही लोकांच्या सल्ल्याने का वागला लोकमान्यांची भूमिका काय होती याचा हा इतिहास.चिरोलच्या ’दि अनरेस्ट एन इंडिया’ या लोकमान्यांवर आणि चित्पावन ब्राह्मणांवर गरळ ओकणारे पुस्तक त्याचे मराठी भाषांतर भास्कर्तरव जाधव व अण्णासाहेब लठ्ठे व प्रो.म.गो.डोंगरे या तिघांनी केले व ते पुस्तक स्वखर्चाने छापून शाहूमहाराजांनी फुकट वाटले. महाराजांनी सर व्हलेंटाईन चिरोलल पुस्तकाच्या लेखनासाठी दरबारी पाहुणा म्हणून ठेऊन घेतले. कागदपत्र परवले, पैसा दिला. महाराजांचे ॠण चिरोलने स्वत: प्रस्तावनेतच मान्य केले आहे. मंडालेहून आल्यावर टिळकांनी चिरोलवर अब्रुनुकसानी चा दावा दाखल केला. या खटल्यात भास्करराव जाधव आणि डोंगरे चिरोल साहेबाचे साक्षिदार म्हणून उभे राहिले. shaahumahaaraajaaMcyaa vedokt prakaraNaat TiLakaaMnI virodh kelaa ase cirolane mhaTale hote tyaasMbMdhaat टिळकांच्य्सा वकिलांनी १९०१ ते १९०८ या काळातले केसरीचे अंक समोर ठेऊन प्रश्न केला की टिळकांनी शाहुमहाराजांच्या वेदोक्ताच्या अधिकाराला कोठे विरिध केला ते दाखवा काअरण या ब्राह्मण द्वेषाने प्रेरित झालेल्यांनी तसा लेखी व तोंडि प्रचार केला होता. तेव्हा या दोघांनीही टिळकांनी वेदोक्ताच्या संबंधात लोकमान्यांनी शाहूमहाराजांना कधिही विरोध केला नाही हे कबूल केले. डोंगरे म्हणाले वेदोक्त प्रकरणात व्यक्तीश: छत्रपतिंविरुद्ध टिळकांनी लिहिल्याचे मला दाखब्वता येणार नाही. किंबहुना शिवाजीच्या वंशजांना वेदोक्ताचा अधिकार आहेच असे टिळक म्हणत होते असे मला वाटते." सं. चिरोल केसचा वृत्तांत. त्तरिहि काही आक्रस्ताळी मंडळि टिळकांना दोष देत आहेत.याच केस मधे सत्यशोधक भास्कररवांची जी साक्ष झाली ती त्यांची मनोवृत्ती स्पष्ट दाखवतात. जाधव म्हणाले , मला या वेदोक्तामधे काहिहि अर्थ दिसत नाही ब्राह्मण विरोदी जातात म्हणून आम्ही हा हक्क मागतो. हिंदुंनाच काय पण मुसलमान ख्रिस्ती यांनाहि हा अधिकार असावा असे मला वाटते. तेव्हा वकिलांनी प्रश्न केला कि मग तुमच्या मागणीप्रमाणे मुसलमान व ख्रिश्चनांनिही वेदोक्ताची मागणी केली असेल. त्यावर जाधवांनी उत्तर दिले. अद्याप त्यांनी ती मागणी केली नाही.जाधवांनी हे प्रकरण कसे रंगवले असेल याचा अंदाज करता येईल.भास्करराव जाधव यांची कार्यशैलीराजोपाध्ये यांची भूमिका मांडणारे पत्र पुढे देतो पण हे सविस्तर पत्र ५ मे १९०२ ला पाठवले त्यावर दुसर्याच दिवशी महाराजांच्या खाजगी कारभार्याचे उत्तर आले व त्यात राजोपाध्यांना बडतर्फ केले गेले. व जप्तीचा हूकूम दिला. १३ मे ला शाहू लंडनला निघाले व १५ मे ला मुंबईला बोटित बसले. त्यांच्या पाठीमागे सत्यशोधक भास्करराव जाधव यांनी राजोपाध्ये यांची उत्पन्ने जप्त केली पण ती केवळ उपाध्येपणाशी संबंधित न करता खाजगी मालकिची उत्पन्ने सुद्धा जप्त केली . एवढेच नव्हे तर या वादाशी संबंध नसलेल्या छोट्या गावातील शेकडॊ ब्राह्मणांना च्या लहानसहान जमिनी जप्त करून त्यांना देशॊधडिला लावले. हि सर्व उत्पन्ने मंदिरांची व्यवस्था लावण्यास पूर्वापार या मंडळिंना दान म्हणून मिळाली होती हि सर्व बामण परागंदा होऊन ब्रिटिश हद्दीत निघून गेली. मूळ प्रश्न होता केवळ क्षत्रीयत्वाचे संस्कार लोप पावल्याने छत्रपतींनी प्रायश्छित्त घेण्याचा होता. त्यांचे क्षत्रीयत्व ब्राह्मण समाजाला मान्यच होते. जाधवांनी खुनशिपणाने राजोपाध्येंवर जप्तीचा हुकूम बजावण्याची वेळ राजोपाध्यांच्या मुलाच्या लग्नघडीलाच काढली. या सत्यशोधक जाधव यांनी ६ मे १९१९ ला एक व्याख्यान दिले त्यात कुणबई वैदिक वर्ग निर्माण करु नये असे उद्गार काढले.वेदपठ्ण करण्यातच पुरुषार्थ नाही असे म्हटलाने छत्रपति शाहू संतापले मग जाधवांनाची सपशेल माफी मागावी लागली.टिळकांची भूमिकाशाहु छत्रपतीं प्रकरणाचा फायदा घेऊन सत्यशोधकांनी ब्राह्मण -क्षत्रिय समाज सोडून सर्वच हिंदु समाजाला,- परधर्मियांनाहि- वेदोक्ताचा अधिकार मिळाव म्हणून प्रचार करत होती. यासंबंधि टिळकांनी लिहिलेले शब्द," जातिभेद हा हिंदु समाजाच्य हाडी खिळलेला आहे. .... हे परंपरागत किंबहुना रचनासंगत भेदाभेद अजीबात सोडून टाकून सर्व हिंदुस्थानातील जातींचा सबगोलंकार करणे इष्ट असले तरी शेकडो वर्षे ते शक्य नाही हे कोणासहि मान्य केले पाहिजे v aamhI aajace praSbnaacaa jo vicaar karaNaar aahot to yaac dhoraNaavar karaNaar aahot. समाजाच्या स्थितीत जो काही पालट कोणास करावयाचा असेल तो व्यवस्थेने बेताबेतानेच केला पाहिजे व तोही असा असला पाहिजे कि त्याची उपयुक्तता लोकांच्या चटकन लक्षात येईल. हल्ली जी वेदोक्ताची चळवळ सुरु झाली आहे ती त्या प्रकारची नाही...मराठे लोकांस वेदोक्त कर्म करणे असल्यास त्यांनी ते खुशाल करावे त्यांचा हात धरणारा या काळात कोणी राहिला नाही. पण अमक्या ब्राह्मणानेच तो आमच्या घरी केला पाहिजे असा आग्रह मात्र त्यास द्घरता येणार नाही.... निरनिराळ्या जातीतील लोकांचा सलोखा कसा व्हाव्चा हे आम्हास पाहणे आहे व तशा दृष्टीनेच या विषयावरील लेख आम्ही लिहीले आहेत."५-११-१९०१ च्या केसरीत टिळक लिहीतात" कोणास वेदोक्ताचा संस्कार करावयाचा असल्यास तो त्याने खुशाल करावा उगाच जातीजातीतील तंटे वाढवण्याची आमची इच्छा नाही व या विषयावरील दोन लेखात तशा प्रकारचा मजकूरही आलेला नाही. तेव्हा नसता दोष आमच्या माथी मारुन आम्हास भलत्याच वादात गोवण्याची कोणाची इच्छा असेल तर ती आमच्याकडून सफल होणार नाही..."लोकमान्य टिळक यांना विद्धंसक सुधारक होण्यापेक्षा विधायक सुधारणावादी व्हावेसे वाटत होते हे स्वच्छ दिसते. आधी याजकिय स्वातंत्र का आधी सामाजिक सुधारणा हा वाद प्रसिद्ध आहेच. पण या प्रकरणात त्यांची अकारण बदनामी केली गेली.टिळक विधायक सुधारणावादी होते.जातीभेद मोडणे त्यांना इष्ट ही वाटत होते पण क्रमाक्रमने.खुद्द शाहु राजांनी तंजावर प्रकरणात मराठा समाजातील भोसले, घोरपडे,पवार ,जाधव आदि केवळ १२ मराठा घराण्यांतच वेदोक्ताचा अधिकार आहे असे सांगीतले म्हणजे खुद्द छत्रपतींनीही सर्व मराठा समाज किंवा सर्व ब्राह्मणेतरांना वेदोक्ताचा अधिकार आहे किंवा हवा असे १९१७ पर्यंत म्हटले नव्हते.सयाजीराव महराजांनी या प्रकरणात विधायक भूमिका घेऊन हा वाद कोल्हापूरप्रमाणे बडोदे संस्थानात माजू दिला नाही. त्यांनी १८९६ ला एका पत्रात म्हंटले आहे की "मला पुराणोक्त आणि वेदोक्त यात स्वत:ला काही कमी जास्त श्रेष्ठ वाटत नाही. मात्र सामाजिक दृष्ट्या वेदोक्त श्रेष्ठ पद्धत मानली जाते. पण अशा रितीने लोक केवळ विधी आणि कर्मे यातच बुडुन धर्माची तत्वे विसरुन गेली आहेत ही खेदाची गोष्ट आहे. म्हणून मी सुधारणा हाती घेतली आहे."शाहु महाराजांना अंघोळ न करता पूजा सांगू पहाणार्या मूर्ख ब्राह्मणाला शासन केल्यावर जे मुख्य राजोपाध्ये त्यांना दरबारातर्फे काही विचारणा झाली.त्यात त्यांना वेदोक्त पद्धतीने विधी करण्याची आपली इच्छा आहे किंवा कसे असे विचारले गेले ते पत्र किंवा यादी ७ - १० - १९०१ चे आहे.यावर राजोपाध्ये ते मुंबईला एका परिक्षेसाठी निघाले होते त्यांनी राजांची समक्ष भेट घेऊन परत आल्यावर शास्त्राप्रमाणे विचार करण्यासाठी बंद पडलेले वेदोक्त विधी कशा प्रकारे सुरु करता येतील याच्या विचारविनिमयासाठी स्वखर्चाने निरनिराळ्या ठिअकाणाचे शास्त्री बोलावतो असे सांगीतले .शाहू राजांची मान्यता मिळाल्यावर ते मुंबाईला निघून गेले. शंकराचार्य ,काशी ,वाई इ, स्वखर्चाने घेऊन येतो असे राजोपाध्ये यांनी राजांना लेखी कळवले होते. त्यास मूक संमती मिळाली. राजोपाध्ये परतल्यानंतर मधल्या ८-१० दिवसात कोणीतरी शाहू राजांचे कान भरले व राजोपाध्यांना काशी आदी हून शास्त्री लोकांना आणण्यास मनाई करण्यात आली. वर उल्लेखलेले पत्र हि राजोपाध्यांना ७-१० ऐवजी १ महिना १० दिवस एवढे उशीरा म्हणजे १८-११-१९०१ ला मिळाले.५- मे १९०२ ला राजोपाध्ये यांनी राजांना एक सविस्तर पत्र पाठवले त्याचा सारांश ,१. रा.ब.दिवाण यांस कळवले ते असे का कळवले ते समजत नाही. आपण वस्तुस्थिती सोडून कळवले हे माझे दुर्दैव आहे. ....२.सरकरवाड्यातील हव्यकव्य कृत्ये वेदोक्त वा पुराणोक्त करायचे काम माझे नाही तर सरकारास जे विधि असतात ते सरकार नसताना मी करायचे असतात.विशेष प्रसंगी सरकार असताना मी फक्त त्यांचे सन्निध असावे एवढेच माझे काम आहे.पद्धत कोणतीही असो.३. आजपर्यंतची वहिवाट काहिही असो, येथून पुढे सर्व धार्मिकविधी वेदोक्त पद्धतीने केले जावे अशी सरकारांची इच्छा आसल्यास तसे करण्यास माझि काहीही हरकत नाही. ४.मला नेहमीच्या वहिवाटिप्रमाणे सूचना मिळाली नाही म्हणून मी हजर झालो नाही. नेहमीप्रमाणेच सूचना मिळताच मी हजर झालो हि.यावरुन असे दिसेल कि मी उपाध्यायाचे काम सोडलेले नाही.५. काशी,नाशिक इ.क्षेत्रांकडून निर्णय आणवले पाहिजेत त्यास हुजुरांची मान्यता पाहिजे.६.शास्त्राची अनुज्ञा आणल्याशिवाय हे काम केले( संस्कार लोप पावल्याने प्रायश्चित्त करुन पुन्हा वेदोक्त पद्धत सुरु करण्यासंबंधि) तर माझेब्वर येथील ब्रह्मवृंदाचा बहिष्कार पडेल. मजवर बहिष्कार पडल्यास माझी हरकत नाही पण मीच बहिष्ख्रुत झालो तर धार्मिक विधी करणार कोण?७. १५ मे ला माझ्या मुलाचे लग्न बावड्याचे जहागिरदार यांचे मुलीशी ठरले आहे. ते झाले की मी शास्त्राच्या निर्णय मिळवण्याच्या उद्योगाला लागतो, व तसा निर्णय मिळवून मी जुलै १९०२ चे आत उत्तर देतो. एखादी वहिवाट बंद पडली कि नव्याने सुरु करताना शास्त्राचा निर्णय आणवण्याव्चा पूर्वापार चालत आलेला सामान्य नियम आहे. तो या बाबत सोडून एकदम वेदोक्त पद्धतीने धार्मिक कृत्ये करण्याचा प्रारंभ केला गे;ला यामुळे हे प्रकरण या थरावर आले हे माझे दुर्दैव आहे.८. सरकरांच्या परंपरागत उपाध्येपणावरुन मला दूर का करण्यात येऊ नये असा प्रश्न प्रस्तुत यादित मला विचारला आहे. या प्रश्नाला सध्या एवढेच उत्तर देतो कि शास्त्राज्ञेस व पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वहिवाटिस अनुसरून मी आपले काम करण्यास सिद्ध आहे तोपर्यंत ह प्रश्नच उद्भवत आन्हि.पण यावर लगेच ६ मेला तुमचे उत्तर समाधनकारक नाही असे उत्तर आले व लगेच जप्तीचा हूकुम काढला जाउण राजोपाध्येंना काढून टाकण्यात आले.व जोडीला त्यांच्यावर राजद्रोह आणि क्षत्रियत्वाचा वाद उकरुन काढला असा खोटाच आरोप केला गेला. वास्तविक राजोपाद्ये यांनी उत्तर दिले त्यात हुजुरांचे घराणे क्षत्रिय का शूद्र याचा प्रश्नच उद्भवत नाही असे लिहिले होते.मधे ३०-३५ वर्षांच्या काळात अज्ञान छत्रपतिंच्या मुंजीही झाल्या नव्हत्या. कारण सर्व कारभार इंग्रजांच्या ताब्यात होता. पण स्वत: शाहु महाराज छत्रपती झाल्यावर याच राजोपाध्यांनी शाहूंना गायत्री मंत्र दिला होता. आणि हे स्वत: महाराजांनीच एका हुकुमात मान्य केले होते. पुढे महाराज श्रावणीही करत असत. जो श्रावणी करतो त्याला वेदोक्ताचाही अधिकार असतोच असतो हे जो धर्मशास्त्र जाणतो त्यालाच कळेल. महाराजांसाठीचे सर्व श्रावणीचे विधी स्वत: राजोपाध्येच करत. या श्रावण्या जुन्या राजवाड्यात भवानी देवीसमोर होत व १६ कायदेकरी म्हणजे धर्मपंडीतहि आपल्या श्रावण्या महाराजांच्या उपस्थितीतच करत.याचा अर्थच असा होता कि , राजोपाध्ये व अन्य पंडीतांना राजांच्या क्षत्रीयत्वाची किंवा वेदोक्ताच्या अधिकाराची कधीही शंका नव्हती. मधल्या काळात ४० वर्षे संस्कार लोप पावला होता. तो प्रायश्चित्ताशिवाय सुरु करणे हे अशास्त्रीय एवढेच राजोपाध्ये व अन्य ब्रह्मवृंदाचे म्हणणे होते. आणि शास्त्राला ते धरुनच होते.१९१२ ला तंजावरच्या वारसा हक्काबद्दल वाद निघाला असता शाहू राजांनी अर्ज केला. एकूण २४ हक्कदार होते. या खटल्यात खालच्या कोर्टाने तंजावर वंश हा धर्मशास्त्र दृष्ट्या संस्कार न केला गेल्याने (लग्न ,मुंज सारखे) शूद्र ठरवला व धर्मशास्त्र दृष्ट्या धर्मपत्नी नसलेल्या व्यक्तीचा अधिकार मान्य केला. यावर शाहु राजांनी अपिल केले व आपल्या घरात कित्येक वर्षे वेदोक्त विधी बंद होते म्हणून आपणही शूद्र आहोत असा मुद्द्दा मांडला. मद्रास हायकोर्टातून निकाल आला. कोल्हापुरचे वेदोक्त प्रकरणही हायकोर्टात निघाले.. ब्राह्मण ज्या पद्धतीने विधी करतात तोच महाराजांना हवा होता. शककर्त्या शिवरायांचाही तसा आग्रह नव्हता. क्षत्रियांस उचित असे विधी गागाभट्टांनी ठरवले त्या प्रमाणे विधी होत. त्यास व प्रायश्चित्तास कोल्हापुरचे महाराज तयार होते तर वाद तेव्हाच मिटला असता . "तेव्हा क्षत्रिय संभाळणे हे मुख्यत: यजमानांच्याच हाती आहे.कोल्हापुरच्या महाराजांनी त्यात चूक करुन पुन्हा उपाध्यायाला आपल्या म्हणण्याप्रमाणे वाकवण्यासाठी कामावरुन काढून टाकले व जप्ती आणण्याचा अन्याय केला " असा अप्रत्यक्ष शेरा मद्रास च्या हायकोर्टाने मारला. शिवरायांप्रमाणे प्रायश्चित्त घेऊन वेदोक्त विधी सुरु करावेत काही काळ विधी केले नाहीत म्हणून त्यांचे क्षत्रियत्व रद्द होत नाहि व ते शूद्र ही ठरत नाहीत असे कोर्टाने सूचित केले.मद्रास हायकोर्टाचा निकाल सुमारे २२५ पानांचा असून तो इंडियन लॉ रिपोर्टरच्या मद्रास्च्या १९२५ च्या vol x L VIII मधे दिलेला आहे.सर्वात गंमत हि की क्षत्रीयत्वासाठी भांडणार्या महाराजांनी ब्राह्मणांप्रमाणे वेदोक्त विधी सुरु केले. ते अद्याप तसेच चालु आहेत.हायकोर्टात मधे काही काळ मुंजी वगेरे वेदोक्त विधी झाअले नव्हते असे पुराव्यातून निषपन्न झाले त्यामुळे कोल्हापुर घराणे किषत्रिय का शूद्र याचा निर्णय देऊ नये अशी विनंती राजांतर्फे करण्यात आली. तशी नोंद निकालात स्पष्टपणे करण्यात आली आहे.महाराजांच्या मृत्युनंतर धर्मविधींपुरते छत्रपती ब्राह्मण पद्धतीने वेदोक्त करतात व त्यापुरते ते ब्राह्मण झालेत आणि हे त्यांनी सुरु केलेले ब्राह्मण पद्धतीचे विधी मराठा पुरोहित करतात. १९१८ ला युवराजांचे लग्न सयाजीरावांच्या नातीशी ठरले. त्यांनी आवश्यक असलेले प्रायश्चित्त यावे असे सुचवले. ७५ वर्षात कोल्हापुरच्या औरस वारसाचा विवाह होणार तेव्हा परंपरेप्रमाणे पहिले केळवण राजोपाध्ये यांचे व्हायचे. त्याप्रमाणे राजोपाध्येंना राजांचा निरोप गेला. पण राजोपाध्ये यांनी मी आता राजोपाध्ये नसल्याने ते शक्य नाही असे कळवले. तेव्हा राजे स्वत: त्यांना भेटले.शेवटि केळवण हि झाले. रितसर प्रायश्चित्थी राजांनी घेतले. राजोपाध्येंच्या व त्यांच्या मुलाच्या देखरेखीखाली सर्व विधी कोल्हापुर व बडोदे येथे झाआले. १६ कायदेकरी ब्राह्मणांपैकी एकाने आपले जप्त उत्पन्न सोडावे म्हणून अर्ज केला तो मन्य झाला. सर्वांची उत्पन्ने सोडण्याचे मान्य करुन छत्रपतींनी आपल्या मनाचा थोरपणा दाखवला. मात्र राजोपाध्ये आणि अन्य ब्राहमणांनी आमची चूक नसता आम्ही अर्ज का करावा अशी भूमिका घेतली व अर्ज केले नाहीत .पुढे महाराजही हि गोष्ट विसरले व कोणाचीही उत्पन्ने सुटली नाहित.केसरीचा राजोपाध्येंना सल्ला काय होता?"...कोल्हापुर येथले राजोपाध्ये यांच्या मूळ सनदा कशा आहेत ते आम्हाला बरोबर माहित नाही. - राजोपाध्ये यांना आमची सूचना आहे की महाराज परत आल्यावर त्यांचे पुढे हे प्रकरण पुन्हा मांडावे व निस्पृह रितीने त्यांची समजूत घालण्याची खटपट करावी आणि ते नच जुळले तर हे प्रकरण इंग्रज सरकार कडे न्यावे. दिवाणी किंवा फौजदारि हक्क देणे ही राजांच्या खुषीतील गोष्ट आहे. पण मामुल वहिवाटीप्रमाणे उपाध्येपण करण्यास तयार असता इनाम गाव काढून घेणे महाराजांच्या खुषीतील अधिकारातील गोष्ट नाही."राजोपाध्ये हे नामदार गोखले यांचे वर्गमित्र असून राजकिय दृष्ट्याही टिळक पक्षिय नव्हते. टिळकांचा त्यांच्याशी कोणताही संबंध नव्हता. केवळ जी माहिती उपलब्ध होत्अ असे त्यातून टिळकांनी भूमिका मांडली. त्यात विधायक सुधारक आणि न्यायाची बूज राखणे एवढाच आधार होता.इंग्रजांची भूमिका...परंतु राजोपाध्यायांनी टिळकांची सूचना न मनता छत्रपती येण्याअगोदरच राजांनी लंडनला जाण्यापूर्वी नेमलेल्या संस्थानाच्या काळजीवाहू कौन्सिल कडे जप्तीच्या फेरविचारासाठी अर्ज केला. कौन्सिल ने तो फेटाळला. त्यवर राजोपध्ये यांनी तो संस्थानच्याच पोलिटिकल एजंट कडे अपिल केले. एजंट ने महाराजंच्य अखत्यारीतला विषय म्हणुन नाकारले.शेवटि राजोपाध्ये यांनी मुंबईच्या गव्हर्नर कडे अर्ज केला. त्यावेळी लॉर्ड नॉर्थकोट हा गव्हर्नर होता. त्याने प्रथम राजोपाध्ये यांच्या बाजूने निकाल दिला. तेवढ्यत शाहु राजे लंडनहून परतले व त्यांनी गव्हर्नरची भेट घेऊन हा निकाल फिरवायला लावला. हा निकाल महाराजांच्य हुषारिमुळे फिरला असे त्यांचे पहिले चरित्रकार कोल्हापुरचे दिवाण लठ्ठे यांनी शाहू मेमॉयर्स भाग १ पृ २०८ वर दिलेल्या टिपात म्हटले आहे.यानंतर राजोपाध्ये यांनी व्हाइसरोय लॉर्ड कर्झन कडे अर्ज केला. पण २-३ वर्शाहे फ्रेजरने तो दाबून ठेवला. ५-०१-१९०५ ला नामदार गोखले यांच्या सांगण्यावरुन उपाध्यायंनी पुन्हा अर्ज पाठवला. तेव्हा सर्वच कागदपत्रे मगवली गेली. त्यावर फ्रेजर ने एक टिपण करुन पठवले त्यावरुन इंग्रजांनी जातीय वाद वाढवणे , कर्झन विरुद्ध फाळणीविरुद्ध टिळकपक्षीयांनी उठवलेल्य रानाला खीळ घालणे व फॊडा आणि झोड या कुटिल राजकारणाचा डाव खेळणे कसे साध्य केले ते दिसेल.या टिपणाच्या सुरुवातीला आलेल्या वाक्यांचा भावार्थ - " मी या केसचा विचार करताना मझे एकेकाळचे पाल्य म्हणून शहू छत्रपतींकडे ओढा असल्याने त्यांचा पक्षपती म्हणून विचार करत आहे हे कबुल करतो."याच टिपणात फ्रेजर म्हणतो," सनदेच्या अर्थासंबंधि शंक असेल तर मला वाटत की राजकारणाच्या दृष्टिने आपण यचा विचार केला पहिजे.जर राजोपाध्येला पूर्ण चेचला नाही तर सरकरची इभ्रत जाईल आणि महाराजांचा पराभव होईल."अश प्रकारे हा न्यायाचा प्रश्न न रहाता इभ्रत व राजकारण यंचा प्रश्न झाला. ब्राह्मणद्वेष्ट्या सत्यशोधक आणि फोडा अणि झोड अशा राजकारणपटु इंग्रजांची युती झाली.राजोपाध्ये कर्झनला पाठवलेल्या प्त्रात म्हणतात, "वेदोक्ताची चळवळ या नावाने कही उपद्य्वापी लोक समाजात विसरल्या गेलेल्या जातीय तेढी पुन्हा पेटवून स्वत:चा फायदा होतोका ते पहत आहेत. लावालाव्या करुन चुकीचे अर्थ सांगून छत्रपतींचे मन कलुषित केले गेले आहे. राजांविषयी आदर राखुन मी सांगूतो की या ने अन्यायकारक सामाजिक बिघाड झाला आहे.""राजोपाध्यायांनी महाराजांना शूद्र म्हणून त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हटले " असा खोटा प्रचर जाधव व अन्य सत्यशोधकांनी केला. ब्रीटीशांनी टिळक पक्शियांवर सूड उगवण्यासाठी त्यास उचलून धरुन ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा वादाला खतपाणी घातले. ब्राह्मण वर्गाला अन्य समाजापासून फोडायचे त्यांना राजकारणासफायद्याचे होते. असे असले तरी इंग्रजांना हा वाद जातीय नाही हे महित होते. याबाबत हिंदुस्तान सरकारच्या सेक्रेटरीला मुंबई सरकारचा सेक्रेटरी सी.एच.हिल याने ३ मर्च १९०५ ला एक पत्र लिहिले त्याच भावार्थ,"कोल्हापुरचे महाराज हे क्षत्रीय आहेत हे राजोपाध्ये पत्रातच म्हणत आहेत.आणि ते तसे म्हणत नाहित असे म्हणण्याचा काहिंचा प्रयत्न या वादाच्या मूळाशी आहे. राजोपाध्ये ४ थ्या उतार्यात म्हणतात, मराठी राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या वेळेपासून कोल्हपुरचे राजघरणे क्शत्रिय असून त्यांना वेदोक्ताचा पूर्ण अधिकार आहे ,त्यात कोणताही वद नाही."थोडक्यात या प्रकरणालात जो ब्राह्मण ब्राह्मणेतर रंग दिला गेला तो काही विषिष्ट लोकांनी. मराठी समाजात जातीय विष पसरवण्याचे कार्य त्यांनी पद्धतशीर पणे केले. आणि शाहू महाराज आणि त्यांच्यबरोबर लोकमान्य टिळकांनाही अकारण या वादात काहिहि संबंध नसताना गोवले गेले. मूळ काय आहे हे न वाचताच अद्यापहि या प्रकरणला जातीय द्वेष वाढवण्यासाठी अद्यापही वापर केला जातो. भले भले लोक याला बळी पडतात तर सामान्यांची काय होत असेल अवस्था?
Thursday, March 26, 2009
Wednesday, March 11, 2009
शेतकरी आत्महत्या, गरिबी आणि मराठा आरक्षण - प्रा. अशोक बुद्धिवंत.
‘मराठा आरक्षण’ हे पुरुषोत्तम खेडेकर संपादित पुस्तक.. त्यात लेखन करणारे बहुतांश नेते मराठा ओबीसीकरण चळवळीचे अग्रणी नेते.. महाराष्ट्रातले राज्यकर्ते त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतात.. पण या लेखकांनी केलेली विधाने, युक्तिवाद पुरावाहीन-तथ्यहीन आहेत.. त्यांचे लेखन विचारी-अभ्यासू मराठा युवकांच्या सर्जनशीलतेला, सहिष्णुतेला आणि विवेकबुद्धीला बधिरता आणणारे ठरणार आहे. त्या लेखनाची ही चिकित्सा..मराठा आरक्षणाचे पुढारी, मराठा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष आणि प्रक्षोभक भाषणे करण्यासाठी प्रसिद्ध असणारे वक्ते पुरुषोत्तम खेडेकर संपादित ‘मराठा आरक्षण’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. मराठा सेवा संघ प्रणित जिजाई प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे. या ग्रंथात खेडेकरांबरोबरच प्रवीण गायकवाड, शांताराम कुंजीर, विकास पासलकर, जयश्री शेळके, प्रभाकर पावडे, विजय काळे आदींचे ज्वालाग्राही लेख आहेत. हे सर्व लेखक मराठा ओबीसीकरण चळवळीचे अग्रणी नेते आणि ताज्या दमाचे मराठा विचारवंत म्हणून ओळखले जातात. ते शासनाच्या विविध कमिटय़ांवर आहेत. राज्यकर्ते नियमितपणे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतात. मराठा आरक्षण चळवळीचे लोकप्रिय नेते म्हणून ते सदैव प्रकाशझोतात असतात.या पुस्तकातील विधानांना संदर्भ देण्याची गरज कोणालाही वाटलेली नाही. ते नेहमी म्हणतात, ‘‘पुरावाफिरावा काही नाही, आम्ही म्हणतो तोच पुरावा.’’ महाराष्ट्रात मराठा समाजाची नेमकी लोकसंख्या किती आहे याबद्दल या पुस्तकात दोन लेखकांनी दोन वेगवेगळे दावे केलेले आहेत. राज्यात मराठा जातीची लोकसंख्या ४० टक्के आहे असे पान ३९ व ४१ वर सांगण्यात आले आहे, तर पान ३० वर ती ५५ टक्के असल्याची माहिती देण्यात आली आहे. आकडय़ांमध्ये एवढी तफावत का हा प्रश्न मात्र विचारायचा नाही. २००१ मध्ये जातवार जनगणना झालेली नव्हती. (१९३१ नंतर ती झालेली नाही.) तरी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष विकास पासलकर यांनी चक्क २००१ च्या जनगणनेच्या आधारावर ही लोकसंख्या ५५ टक्के असल्याचे ठामपणे सांगितले आहे. महाराष्ट्रात विविध जातिजमातींना ५२ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. याचा अर्थ महाराष्ट्रात त्यांची किमान लोकसंख्या ५२ टक्के असणारच. प्रत्यक्षात ती ६२ टक्क्यांवर असावी असे तज्ज्ञ मानतात. महाराष्ट्राची लोकसंख्या ५५ + ५२=१०७ टक्के होते. महाराष्ट्रात मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी व इतर धर्मीयांची लोकसंख्या किमान सुमारे १५ टक्के आणि ब्राह्मण, जैन, मारवाडी, गुजराती, सिंधी, शीख, कायस्थ व इतर प्रगत समाज (ज्यांना आरक्षण नाही अशांची संख्या) किमान बारा टक्के असल्याचे सांगितले जाते. आता हे समाजघटकच महाराष्ट्रात अस्तित्वात नाहीत असे मानणे भाग आहे. समजा मराठा जातीची संख्या ४० टक्केच आहे हा दावा मान्य केला तर २० टक्के अनुसूचित जाती, जमाती, इतर धर्मीय १५ टक्के (ज्यांची २००१ साली जनगणनेत स्वतंत्र नोंद झालेली आहे.) आणि खुल्या गटातील लोक १२ टक्के, विशेष मागास प्रवर्ग आणि भटके विमुक्त १३ टक्के, या सर्वाची बेरीज १०० टक्के होते. एक किरकोळ प्रश्न असा आहे की, ज्या ओबीसीत मराठा समाजाला जायचे आहे त्यांची लोकसंख्या वरीलप्रमाणे महाराष्ट्रात शून्य टक्के आहे असे ठरते. मग जो प्रवर्गच महाराष्ट्रात नाही त्यात मराठा समाजाला कसे घालणार?१९३१ नंतर जातवार जनगणना बंद झाल्याने कोणत्याही जातीची अचूक लोकसंख्या सांगणे शक्य नाही. सर्व तज्ज्ञांनी १९३१ च्या आधारावर मराठा व कुणबी समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या जास्तीत ३१ टक्के असल्याचेच प्रमाणित केले आहे. (पाहा, सुहास पळशीकर, नितीन बिरमल, महाराष्ट्राचे राजकारण, राजकीय प्रक्रियेचे स्थानिक संदर्भ, प्रतिमा प्रकाशन, २००७, पान ३३/३४) त्यात मराठा किती व कुणबी किती? नेमके सांगणे कठीण असले तरी विदर्भ व कोकणात बहुतेक सर्वानी कुणबी जातीची प्रमाणपत्रे मिळविलेली आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही ही मोहीम जोरात चालू आहे. ‘सोयरिकीच्या वेळी मराठा आणि सवलतीला कुणबी’ हे महाराष्ट्राचे आजचे सूत्र आहे. अशा स्थितीत १६ टक्के कुणबी आणि १५ टक्के मराठा अशी लोकसंख्या असल्याचा अंदाज पटण्याजोगा वाटतो.शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सगळ्या देशाच्याच चिंतेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याचाही आपल्या राजकारणासाठी या मंडळींनी वापर सुरू केलेला आहे. एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी ९७ टक्के आत्महत्या या कुणबी मराठय़ांच्या आहेत, असा दावा पान २९ वर करण्यात आलेला आहे तर ही संख्या ७० टक्के असल्याची माहिती पान ४९ वर देण्यात आली आहे. दुसरीकडे ‘३७०० पैकी ३२४६ म्हणजे ८८ टक्के आत्महत्या मराठा-कुणब्यांच्या असल्याची’ नोंद करण्यात आली आहे. (पान २५) या आकडेवारीचा आधार काय? महाराष्ट्र शासनाच्या ‘यशदा’ संस्थेतर्फे शेतकरी आत्महत्यांवर संशोधनपर ग्रंथ २००६ मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. आय. ए. एस. अधिकारी श्रीमती मिता लोचन आणि पंजाब विद्यापीठाचे प्रा. डॉ. राजीव लोचन यांनी यवतमाळ जिल्ह्यातील २००१ ते २००५ या काळातील ३९१ आत्महत्यांची प्रवर्गनिहाय माहिती दिली आहे. त्यानुसार आत्महत्या करणाऱ्यांमध्ये अनुसूचित जातीचे शेतकरी १६.३७ टक्के आहेत. भटक्या विमुक्त समाजातील २१.७४ टक्के व १६.११ टक्के आदिवासी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, ओबीसींचे प्रमाण ३४.२७ टक्के आहे. खुल्या प्रवर्गातील ११.५१ टक्के शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती या ग्रंथात देण्यात आली आहे. (पा. ८१) त्यांनी त्यातील १४८ शेतकऱ्यांची तपशीलवार माहिती दिली आहे. (पा. १७५ ते २५६) त्यानुसार मराठा समाजाच्या अ ात्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण २.७ टक्के आहे. अडीच टक्क्यांवरून ते एकदम ७० टक्के किंवा ९८ टक्क्यांवर नेणाऱ्या मंडळींच्या खोटेपणाबद्दल काय बोलावे? ज्या कुणबी समाजाला ओबीसीचे आरक्षण आहे, त्याची आत्महत्येची टक्केवारी २७ आहे. याचाच अर्थ ओबीसी आरक्षण असूनही त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाहीत हे दुखण्याचे मूळ आहे. त्यावर आरक्षण हा उपाय कसा असू शकणार? वडाची साल पिंपळाला लावण्याचा हा उपद्व्याप आहे. ज्यांना आरक्षण आहे त्या अनुसूचित जाती, जमाती, भटके-विमुक्त, ओबीसी, एसबीसी आत्महत्यांचे प्रमाण ८८ टक्के आहे आणि खुल्या प्रवर्गातील समाजांचे १२ टक्के आहे. त्यात मराठा समाजाची संख्या तीन टक्के असताना ती अवास्तव फुगवून सांगून मराठा तरुणांची माथी भडकावून देण्याचा उद्योग या संघटना करीत आहेत. चळवळीत अभिनिवेश निर्मितीसाठी थोडी अतिशयोक्ती करावी लागते. ती समर्थनीय नसली तरी समजून घेता येते. परंतु ३ टक्क्यांवरून मराठय़ांच्या आत्महत्या फुगवून ७० टक्के ते ९८ टक्के असल्याचा प्रचार करणे हा सामाजिक गुन्हाच आहे. राज्यात सगळ्याच समाजात गरीब आहेत. त्यात उघडय़ावर किंवा पालावर राहणारे भटके विमुक्त आणि जंगलातले आदिवासी यांची गरिबी कुपोषणाने मरण्याइतकी भयावह आहे. त्यानंतर क्रम एस. बी. सी. आणि ओबीसींचा लागतो. मराठा समाजातही गरीब आहेत. मजुरी करणारे वा हमाली करणारे गरीब मराठा आहेत. पण दागिने मोडून खाण्याची एक पद्धत असते तशी या हमाल/मजुरांची गरिबी मोडून खाण्याचा उद्योग आर्थिक सुस्थितीतील या आरक्षणवादी नेत्यांनी सुरू केलेला आहे. मराठा समाजाच्या दारिद्रय़ाचे भडक चित्रण करून त्यावर आरक्षण देणे हाच एकमेव मार्ग असल्याचे खडसावून सांगितले जात आहे. खरे म्हणजे आरक्षण हा गरिबी दूर करण्याचा कार्यक्रम नाही. त्यासाठी वेगळे मार्ग आहेत. वेगळी पॅकेजेस आणि घटनेच्या कलम ३८, ३९, ४१, ४६ चे संरक्षण आहे. तिकडे न जाता मुद्दामच आरक्षणाचा धोसरा लावला जात आहे. मराठा समाजाच्या हजारो कुटुंबांची जिल्हावार पाहणी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने २००८ मध्ये केली. बापट आयोगाच्या अहवालात त्याची माहिती देण्यात आली आहे. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाचे २३ गुणांपैकी किमान १२ किंवा त्याहून जास्त गुण मराठा समाजाला मिळाले असते तर या समाजाला ओबीसीत घालता आले असते. जालना व बीड जिल्ह्य़ात या समाजाला काठावरचे गुण पडले. इतरत्र २८ जिल्ह्य़ांमध्ये अत्यल्प गुण मिळाले. मराठा समाजाच्या गरिबीचे हृदयद्रावक चित्र रंगवणारे हे विसरतात की मराठा समाजाला या पाहणीत ७ जिल्ह्य़ांमध्ये अवघा १ गुण मिळालेला आहे. ७ जिल्ह्य़ात २ किंवा ३ गुण मिळालेत. ४ ते ७ गुण मिळालेले जिल्हे ६ आहेत. चार जिल्ह्य़ांत ८ किंवा ९ गुण मिळालेले आहेत आणि १० किंवा ११ गुण मिळवणारे जिल्हे चार आहेत. मराठा समाजाच्या गरिबीकडे आरक्षणसमर्थक नेते इतर समाजाच्या गरिबीच्या तुलनेत बघत नाहीत. एकटा मराठा समाजच तेवढा गरीब आहे किंवा इतरांपेक्षाही गरीब आहे अशा पक्षपाती पद्धतीने ते या विषयाकडे बघत आहेत, असेच खेदाने म्हणावे लागते. या पुस्तकातील गरिबीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे- (१) ‘राज्यात ७० टक्के मराठा समाज दारिद्रय़रेषेखालील जीवन जगत आहे.’ (पा. २५), (२) ‘खेडय़ात एकाही मराठय़ाचे घर पक्के बांधलेले नाही.’ (पा. २०), (३) ‘९९ टक्के ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात इतर कुणाहीपेक्षा जास्त मागासलेला आहे.’ (पा. २०), (४) ‘मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक अवस्था दलितांपेक्षाही दयनीय आहे.’ (पा. २७), (५) ‘बीड, लातूर, नांदेड या तीन जिल्ह्य़ांतील मराठा समाज तेली, वंजारी, धनगर, सोनार, भोपे यांच्यापेक्षा शैक्षणिक, आर्थिक, समाजिक क्षेत्रात अत्यंत मागासलेला आहे.’ (पा. ३२), (६) ‘स्वराज्यनिर्माते मावळे आज भिकारी झाले आहेत. त्यांचा त्यागही समाज विसरला आहे. आज मराठा समाजाला आधाराची गरज आहे. तो एकमेव आधार म्हणजे ओबीसी आरक्षण हाच होय.’ (पा. ३२), (७) ‘मराठा समाजातील ९९ टक्के लोक हे सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेले आहेत.’ (पा. ४४), (८) ‘मराठा समाजातील ९० टक्के कुटुंबांची घरे कच्ची आहेत.’ (९) ‘कोकणातील समाजबांधव आदिवासींपेक्षाही मागे आहेत?’ (पा. ३१).गरिबांचा कळवळा कोणालाही आला तरी ती चांगलीच गोष्ट आहे. पण गरिबांना पुढे करून त्याचा फायदा उपटण्यासाठी किंवा त्यांच्या दारिद्रय़ाचे प्रदर्शन मांडून त्या विक्रीद्वारे आपले राजकीय पुनर्वसन करण्यासाठी हे केले जाते तेव्हा गरिबांची आणि गरिबीची ती थट्टा बनते. ज्या नेत्यांच्या घरात अनेक टर्म आमदारक्या आहेत, जे निवडणुकांवर कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक करतात, ज्यांच्याकडे आजच्या काळातही शेकडो एकर जमिनी आहेत, ज्यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या आहेत, ज्यांच्या संघटनांमध्ये हिशोब न दिल्यामुळे फुटी पडलेल्या आहेत ती मंडळी जेव्हा गरिबीबद्दल आणि गरिबांबद्दल खोटय़ा कळवळ्याने लिहितात तेव्हा ते अपराधभावातून आलेले लेखन आहे असेच म्हणावे लागते.मराठा समाज सामाजिकदृष्टय़ा मागासलेला आहे काय, या प्रश्नाचे उत्तर शोधताना गावगाडय़ात आज त्याला इतर जाती हलके समजतात काय? त्याला सामाजिक अन्याय सोसावा लागतो काय? त्याला उच्च जातींपासून संरक्षण देण्याची गरज आहे काय? आदी प्रश्नांचा शोध घ्यावा लागतो. यावरचे हुकमी एक्के म्हणून वापरले जाणारे बिनतोड युक्तीवाद या ग्रंथात अनेकवार पेरलेले आढळतात. (१) ‘स्पृश्य व अस्पृश्य हे दोघेही दलितच. दलित ही धर्माधिकार वंचित समूहाची अवस्था आहे. म्हणजे स्पृश्य व अस्पृश्य हे दलितच होते’ (पा. १८). (२) ‘शिक्षण, आर्थिक, राजकीय-सहकारात मराठे मालक असले तरी चालक केवळ ब्राह्मणच आहेत!’ (पा. ३०) (३) ‘शिवरायांच्या राज्याभिषेकास विरोध होणे, शाहूंना वेदोक्त अधिकार नाकारला जाणे यावरून सिद्ध होते की मराठा समाजाला सामाजिक मागासलेपणाचे सर्वच्या सर्व गुण प्राप्त होतात’ (पा. ४७). (४) ‘ब्राह्मण समाजात जसे अत्यल्प सज्जन आहेत तसेच मराठा समाजातही अत्यल्प दुर्जन असू शकतात. हा समाजशास्त्रीय सिद्धांत आहे’ (पा. १९). (५) ‘आरक्षणासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्याच अटी असताना राजकीय, आर्थिक, सहकार वा इतर चर्चा करणे निर्थक व दिशाभूल करणारे आहे’ (पा. ३०). (६) ‘मराठय़ांना जे निकष पूर्ण करायला सांगितले जात आहेत ते माळ्यांना लावल्यास ओबीसीतून सर्वप्रथम माळी जात वगळावी लागेल. सत्ता, संपत्ती, अधिकार अशा क्षेत्रात माळी समाजास मराठा समाजापेक्षा जास्त प्रतिनिधित्व आहे?’ (पा. ३०). (७) ‘राजकारण, सहकार, शिक्षण संस्था यावरच समाजाचा सर्वागीण विकास अवलंबून नसतो.’ (पा. ३१). (८) ‘मराठा-कुणबी बेटीव्यवहार करणार का? पाटील, देशमुख, पंचकुळी, शहाण्णवकुळी, यांचे विसर्जन करणार का? हे प्रश्न जातीसमूह अंतर्गत चर्चिले जाणारे आहेत. त्याचा आरक्षणाशी काडीमात्रही संबंध नाही.’ (पा. ५०). (९) ‘जातीअंतर्गत विविध पोटजातीत सरसकट विवाह माळी, सोनार, कुणबी, वंजारी, शिंपी अशा कोणत्याही जातीत होत नाहीत. त्यामुळे काल्पनिक व कथा कादंबऱ्यांतील मराठा, देशमुख, पाटील रंगवायचा नि इतर समाजाची दिशाभूत करायची हा बौद्धिक व्यभिचार आहे’ (पा. २८) अशी सगळी मांडणी करण्यात आली आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाला विरोध झाला एवढेच अर्धसत्य सांगायचे, परंतु त्यांना क्षत्रिय म्हणून राज्याभिषेक झाला व त्यांच्या पुढच्या सगळ्या पिढय़ांनी ती प्रतिष्ठा भोगली हे मात्र दडवून ठेवायची हातचलाखी केली जाते. राजर्षी शाहूंच्या वेदोक्त अधिकाराला झालेला विरोध खेदजनक होता, पण म्हणून त्यांना पुढे वेदोक्ताचा अधिकार दिला गेला आणि तो त्यांनी कायम वापरला हे का सांगायचे नाही?मराठा समाज शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेला आहे हे सांगण्यासाठी या पुस्तकात कसे दावे केले आहेत ते पाहण्याजोगे आहे. (१) ‘महाराष्ट्र शासनाच्या अहवालानुसार मराठा समाजाच्या मुलांची मॅट्रिकपर्यंत गळती ८५ टक्के तर मुलींची गळती ९१ टक्के आहे.’ (पा. २०) (२) ‘मराठा समाजातील ९९ टक्के लोक हे सामाजिक, शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेले आहेत.’ (पा. ४४) (३) ‘ग्रामीण महाराष्ट्राची साक्षरता ७०.८४ टक्के आहे. (१९९८-९९) ५६ टक्के विद्यार्थी इ. १० वीपर्यंत गळती होतात. राज्य सरासरीच्या २५ टक्के जादा गळती मराठा समाजात आहे.’ (पा. ४९) महाराष्ट्र शासनाच्या अहवालाचा हवाला देऊन मराठा मुलांची गळती ८५ टक्के असल्याचे सांगणे आणि मुलींची गळती ९१ टक्के असल्याचे सांगणे हा बनवाबनवीचा प्रकार आहे. असा कोणताही अहवाल महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला नाही असे शिक्षण खात्यातले अधिकारीच सांगतात. दुसरीकडे राज्य सरासरीपेक्षा २५ टक्के जादा गळती मराठा समाजात आहे याला आधार काय? एकाच पुस्तकाच्या पान २० व ४९ वरील माहितीत एवढी तफावत का? कारण हे सगळेच आकडे कपोलकल्पित आहेत आणि लोकांची फसवणूक करण्यासाठीच ते दिलेले आहेत. प्रत्यक्षात आज राज्यातील ५४ टक्के शिक्षण संस्थांचे पदाधिकारी मराठा असल्याचे डॉ. सुहास पळशीकर, नितीन बिरमल यांच्या पुस्तकात पान ६२ वर बघता येईल.मराठा समाज हा सत्ताधारी समाज असून सर्व मोक्याच्या जागा त्याच्या ताब्यात आहेत. त्याच्याकडे ग्रामपंचायत स्तरावर ६२.५ टक्के; पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर ८२.३ टक्के; सहकारी संस्थांमध्ये ७१.०४ टक्के नेतृत्व आहे. एकटय़ा मराठा समाजाचे ४५ टक्के आमदार गेली ५० वर्षे महाराष्ट्रात निवडून येतात. (पळशीकर, पृ. ८२, ७७) खेडेकरांच्या पुस्तकातील याबाबतची माहिती मात्र बघण्याजोगी आहे. (१) ‘मराठा समाजातील केवळ १ टक्के लोक हे कुठे जिल्हा परिषद, कृषिउत्पन्न बाजार समित्यांवर किंवा आमदार, खासदार आहेत म्हणून त्यांना आरक्षण नाकारणे गैर आहे. मराठा समाजातील केवळ एक टक्के लोकांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास हा संबंध समाजाचा विकास ठरू शकत नाही.’ (पा. ४४) (२) ‘मराठा समाज हा सत्तेवर आहे हा सतत पसरवला जाणारा गैरसमज वा अपप्रचार आहे’ असे पा. १९, ३६, ५१ व ५६ वर पुन:पुन्हा सांगण्यात आले आहे. ‘शरद पवार यांच्याव्यतिरिक्त मराठय़ांची दुसरी हायकमांड नाही’ असेही प्रतिपादन या पुस्तकाच्या पान ३६ वर आहे. तेच शरद पवार मराठय़ांना राजकीय आरक्षणाची गरज नाही असे सांगताना म्हणाले होते, ‘‘एकटय़ा पुणे जिल्'ाात १८ पैकी १३ आमदार मराठा समाजाचे आहेत, त्यांना राजकीय आरक्षणाची गरज काय?’’ यावरून खरं कोण बोलतंय? खेडेकर की शरद पवार?मराठा समाज उदार असल्यामुळेच त्यांनी इतर समाजांना संपवले नाही, अशीही माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. मराठी लेखकांनी मराठा समाजाची भलावण करण्यासाठी केलेली ही काही विधाने- (१) ‘ज्या समाजाचे मुख्यमंत्री झाले नाहीत ते माळी, मारवाडी, गुजराती, सिंधी व एकदाच ज्यांचा मुख्यमंत्री झाला तो ब्राह्मण समाज गेल्या ५० वर्षांत संपायला पाहिजे होते, पण तसे झालेले नाही. याचे कारण मराठा समाजाची उदारमतवादी मानसिकता समजावी.’ (पा. ३१) (२) ‘राज्याची सत्ता मराठय़ांच्याच हातात असतानाही मराठा समाजाचा विकास झाला नाही, कारण मराठा समाज इतर समाजाच्याच विकासाकडे लक्ष देतो.’ (पा. १९) (३) ‘नेतृत्व हा मराठा गुण आहे. मराठा समाज बौद्धधम्मीय झाल्यास तो देशपातळीवरील सर्वच बौद्धधम्माचे नेतृत्व करील. सर्वच सवलती घेईल. मराठा बौद्धांचाच फक्त विकास होईल.’ (पा. २१) (४) ‘उंदीर जगवायचा असल्यास सापापासून दूर ठेवावा लागतो. यात सापाचा द्वेष नाही. याच धोरणानुसार आम्ही शिवधर्मामध्ये इ.स. तीन हजार अकरापर्यंत ब्राह्मणांना प्रवेश न देण्याचे धोरण आखले आहे.’ (पा. २२) (५) ‘गेली ४० वर्षे माळी समाजाने निळू फुले या कलाकाराचा गैरवापर करून मराठा समाजाची जाणीवपूर्वक बदनामी केली काय, अशी शंका येते.’ (पा. ३१) (६) जगातील क्रमांक एकच्या शूर व लढवय्या मराठा समाजाला गेल्या ६० वर्षांत एकही राष्ट्रपती नाही, प्रधानमंत्री नाही, सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश नाही, भारतरत्न नाही! तुलनेत प्रशासनात आयएएस, आयपीएस वा तत्सम अधिकारी नाहीत. शिक्षण संस्था, सहकार, शेती, मराठा समाजाच्या लोकांच्या ताब्यात आहे, पण त्यांनी त्याचा लाभ कधीच केवळ मराठा समाजासाठीच राखून ठेवला नाही. त्याचे लाभार्थी ब्राह्मणांसह सर्वच ओबीसी, एससी, एसटी, मायनॉरिटीचे जातसमूह आहेत.’ (पा. १९) (७) ‘राजकीय सत्ता मुख्यमंत्र्यांच्या नव्हे तर देशाच्या प्रधानमंत्र्याच्या हातात असते.’ (पा. १९)या लेखनामध्ये प्रचंड कडवटपणा आहे. इतर समाजांविषयी वापरलेली भाषा तुच्छतादर्शक आणि आकसपूर्ण आहे. मराठय़ांना ओबीसी आरक्षण पाहिजे, पण ते अजून मिळाले नाही तोच मूळच्या ओबीसींना ओबीसीतून काढून टाका अशी मागणी करण्यात आली आहे. ३२ टक्के आरक्षणधारकांपैकी माळी, धनगर, वंजारी, लेवा पाटील, तेली, भंडारी, आगरी, कोळी, गवळी यांची प्रगती मराठय़ांपेक्षा जास्त झालेली असल्याने त्यांची ओबीसीतून हकालपट्टी करण्याचा फतवा या पुस्तकाद्वारे काढण्यात आला आहे. (पा. ३० ते ३२).मराठा सेवा संघाने आजवर १०२ पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. ‘मराठय़ांच्या आरक्षणाचे क्रूर राजकारण’, ‘ब्राह्मणी धर्मानुसार मराठे शूद्रच’, ‘कुमार केतकरांवर हल्ला झाला?’, ‘आरक्षण वाढवा, देश घडवा’, ‘कुणबी मराठा समाजाच्या यशाची पंचसूत्री’, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दहशतवाद’ ही त्यातील काही होत. सेवा संघामार्फत कार्यकर्त्यांना ही पुस्तके पुरविली जातात. कार्यकर्ते त्यांच्या आधारे राज्यभर भाषणे करतात. या पुस्तकांमध्ये रेटून खोटी विधाने कशी केलेली असतात त्याचे काही नमुने बघता येतील. या पुस्तकात ‘राज्य मागासवर्ग आयोग’ स्थापन करण्याचे श्रेय संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांना देण्यात आले आहे. मंडल आयोग प्रकरणात इंदिरा सहानी केसचा निकाल देताना १६ नोव्हेंबर, १९९२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ४ महिन्यांत केंद्राने व सर्व राज्यांनी मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार १५ मार्च, १९९३ रोजी महाराष्ट्र सरकारने आयोगाची स्थापना केली. सेवा संघ मात्र त्याचे श्रेय स्वत:कडे घेताना म्हणतो, ‘‘महाराष्ट्र सरकारने मागासवर्गीय आयोग स्थापन करावा यासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडने सतत प्रयत्न केले. १९९७ मध्ये महाराष्ट्र सरकारने हा आयोग नेमला.’’ (पा. १७). त्यासाठी स्थापनादेशाचे वर्षही त्यांनी १९९३चे १९९७ करून टाकले.‘मूळच्या ओबीसींमध्ये फक्त कुणबीच होते. माळी व तेली समाज नव्हते. ते तब्बल चार वर्षांनी घातले गेले’ अशीही अर्धसत्य माहिती या पुस्तकात आढळते (पा. १२). प्रत्यक्षात महाराष्ट्रात ओबीसींची सर्व राज्यांत लागू पडणारी १८० जातींची यादी १ ऑक्टोबर १९६७ रोजी प्रकाशित करण्यात आली. त्यात (३२) धनगर, (७८) कोळी, (७९) कोष्टी, (८२) कुंभार, (८३) कुणबी, (१३२) रंगारी, (१५१) स्वकुळ साळी, (१५२) पद्मशाली, (१५३) शिंपी, (१६९) वंजारी, (१७४) सुतार इ. प्रमुख समाज होते. त्यानंतर १३ एप्रिल १९६८ रोजी १८२ वर तेली आणि १८३ वर माळी आले.कालेलकर आयोगाच्या यादीत मराठा होते, असे या पुस्तकात वारंवार लिहिण्यात आले आहे. खरी गोष्ट अशी आहे की, कालेलकर आयोगाच्या (१९५३- १९५५) काळात महाराष्ट्र राज्य बनलेले नव्हते. १ मे १९६० रोजी ते प्रामुख्याने मुंबई राज्यात त्याला इतर प्रांतांचा काही मराठी भाषक भाग जोडून बनले. कालेलकर आयोगाच्या त्रिखंडीय अहवालाच्या दुसऱ्या भागाच्या पान २६ ते ४५ वर मुंबई राज्यातील ३६० जातींची यादी दिलेली आहे. त्यात कुणबी, माळी, धनगर, वंजारी आहेत; परंतु मराठा नव्हते. तरीही बिनधास्तपणे खोटे का सांगितले जाते?अॅट्रॉसिटी अॅक्ट (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) हा दलित, आदिवासींना सवर्णाच्या अत्याचारापासून संरक्षण देण्यासाठी बनवण्यात आला आहे. तो रद्द करण्यात यावा, अशी मराठा समन्वय समितीची प्रमुख मागणी आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचे तोंडदेखले नाव घेणारी ही मंडळी किती ढोंगी आहेत. त्याचा पुरावा म्हणजे जानेवारी २००९ मध्ये पुण्याच्या बालगंधर्वमध्ये संभाजी ब्रिगेडतर्फे आरक्षण परिषद घेण्यात आली. या परिषदेच्या निमंत्रणपत्रिकेवर आरक्षणाचे जनक असणाऱ्या फुले- शाहू- आंबेडकरांचे फोटो टाळून ‘स्वजातीयांचेच’ फोटो छापण्यात आले होते. या पुस्तिकेत डॉ. आंबेडकरांबद्दल गरळ ओकणाऱ्या श्रीमती शालिनीताई पाटील यांचीही भलामण करण्यात आली आहे. या कायदेपंडित, अभ्यासक असून जन्माने व विचाराने सत्यशोधक समाजाच्या असल्याचा जावईशोध लावण्यात आला आहे. ‘डॉ. आंबेडकरांचे नाव दिल्यामुळे मराठवाडा विद्यापीठाला कलंक लागला आहे. आपण सत्तेवर आलो तर दुसरे शुद्ध स्वरूपाचे विद्यापीठ सुरू करू’ असे जातीयवादी फुत्कार काढणाऱ्या या ताई सत्यशोधक कशा असू शकतात?‘साक्षर दलितांनी बौद्धिक व्यभिचाराचा कळस गाठला की, त्यांना ब्राह्मणांचे दुष्कृत्य झाकून त्यांच्या तथाकथित सत्कृत्यावर लिहायला, बोलायला भरभरून येते’ असा आरोप या पुस्तकात करण्यात आला आहे (पा. १८). त्याचा सार्वत्रिक निषेध झाला पाहिजे. ‘महाराष्ट्रात यापूर्वी गोवारी समाजाने आरक्षणासाठी १३० हुतात्म्यांचा बळी दिला. मराठा शहिदांचे स्मारक करण्याची वेळ येऊ देऊ नका’ अशी चिथावणी देण्यापर्यंत मजल गेली आहे (पा. ३८). म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावू नये यासाठी या पुस्तकाचे पोस्टमार्टेम विस्ताराने करणे भाग पडले. हे सगळेच लेखक शासनाच्या विविध कमिटय़ांवर काम करतात. राज्यकर्ते त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात. ते मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रालयात बैठकांमध्ये बसलेले असतात. ही मंडळी महाराष्ट्राला आणि मराठय़ांना विनाशाकडे घेऊन जात आहेत. त्यांचे असे खोटारडे, द्वेषपूर्ण आणि अतिरेकी लेखन बघून तरी विचारी मराठा समाज त्यांची साथ सोडील काय? राज्यकर्ते त्यांच्यापासून दूर राहतील काय? असे लेखन मराठा युवकांची सर्जनशीलता, सहिष्णुता आणि विवेकबुद्धी बधिर करीत असल्याने त्याला वेळीच पायबंद घातला गेला पाहिजे.
-प्रा. अशोक बुद्धिवंत
-प्रा. अशोक बुद्धिवंत
Wednesday, October 8, 2008
धोबीपछाड १
गेले काहि दिवस माती मऊ आहे म्हणुन ती मुळाने खणण्याचा अट्टाहास काहि जण करीत आहेत. पण आता परीस्थिती अति झालं आणि हसु आलं याच्याहि बाहेर गेलीये. मुळात फक्त ब्राह्मण द्वेष हा एक आणि एकच अजेंडा काहि संस्थांकडुन अव्याहत राबवला जातोय. आणि त्याला कोणाचा राजकिय पाठिंबा आहे हे उघड-गुपित आहे.
तसा मूळातुन विचार करता ब्राह्मण समाजाने दलितांवर बरेच अत्याचार केले आहेत हा सत्य इतिहास आहे. पण सगळं खापर जे एकट्या ब्राह्मणांवर फोडलं जातय त्यात मात्र तथ्य नाहिये. उलट ब्राह्मण समाजापेक्षाहि काकणभर जास्त इतर वर्णांनी त्रास दिलाय. बर्याच दलित नेत्यांनी तसं स्पष्टपणे ऐकवले सुध्दा आहे. सध्या ब्राह्मणांवर गरळ ओकण्याचा जो काहि हिन प्रकार सुरु आहे तो शिसारी आणणारा आहे. फुले-आंबेडकर-शाहु-शिंदे यांनी देखिल इतक्या खालच्या थराला जाऊन ब्राह्मणांवर गरळ ओकली नव्हती. आणि तसे बघता यांचे काहि सहकारी अथवा यांना पाठिंबा देणारे काहि जण तर ब्राह्मणच होते. महात्मा फुलेंना शाळेसाठि जागा देणारे “भिडेच” होते. बालगंधर्व तर शाहुंच्या गळ्यातील ताईतच होते, इतके कि शाहुंचे उजवे हात समजले जाणारे जाधव प्रभुती देखिल “तुम्हांला बालगंधर्व जास्त जवळचे वाटतात !” असे हिरमुसुन म्हणताना दिसतात. शिंदे तर टिळकांच्या जवळच्या व नंतर तात्विक वादांमुळे दुर गेलेल्यांपैकी एक. महर्षी शिंदे यांनी सावरकरांवर त्यांच्या जात्योच्छेदनाच्या कार्यामुळे जाहिर स्तुतीसुमने उधळली होती. थोडक्यात सामाजिक-राजकिय अथवा तात्विक कारणांनी वरील प्रस्थापितांनी ब्राह्मणांवर कडक ताशेरे ओढले होते पण त्यांनी “गरळ” ओकली नव्हती. उलटपक्षी टिळक-शाहु वादात एका केस संबधी काहि अति गोपनीय कागद टिळकांपर्यंत पोहोचतील व टिळकांना त्यांचीच बाजु भक्कम करता येईल अशी व्यवस्थाच शाहुंने केल्याचा उल्लेख मिळतो. याबाबत प्रबोधनकारांनी शाहुंना प्रश्न विचारल्यावर “अरे तो(लोकमान्य टिळक) तिथे इंग्रजांशी एकहाती झुंज घेत असताना त्याच्या मार्गात कुटल्याहि कारणाने आम्हि का यावे?” असे उत्तर दिले. आणि आज त्याच टिळकांवर “लोकमान्य कसला भटमान्यच” असे एकेरी शेलकी विशेषण लावत हे फिरत आहेत. आणि अशी शेलकी-निर्बुध्द विशेषणे एकट्या लोकमान्यांवरच नव्हे तर “ब्राह्मण” असलेल्या प्रत्येकावर चिकटवत फिरत आहेत.
आता दादोजी कोंडदेव-समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामाजिक-राजकिय संबधांवर बोट ठेवण्यात येत आहे. तसा तर हा वाद जुनाच आहे. सुरुवात महात्मा फुल्यांनी केली. “गागाभट्ट व रामदासाने निरक्षर शिवाजीस गोड बोलुन फसविले!” अशी एक ओळ देखिल त्यांच्या लिखाणात सापडते. पण छत्रपती शिवाजी महाराज हि व्यक्ती निरक्षर मुळिच नव्हती व समोरचा गोड बोलतोय म्हणुन फसेल अशी तर नव्हतीच नव्हती. भारतात जे “द्रष्टे” झाले त्यापैकी एक असलेले शिवराय अश्या भुलथापांना बळि पडत असते तर स्वराज्य उभे राहिलेच नसते. महाराज काळाच्या फार पुढचा विचार करायचे. आणि महाराजांना माणुस ओळखता यायचा म्हणुनच “आम्हि महाराजांचे सेवक, तुझा कौल कोण घेतो? शिवशंभु आम्हांस हसेल!” असे म्हणत दिलेरखानावर दातओठ खाणारा मुरारबाजी पुरंदरावर स्वराज्यासाठी पडला. अशी माणसे गोळा करुन एकत्र आणणारे शिवराय गागाभट्ट व रामदास स्वामी यांना ओळखणार नाहित काय?
विषय निघालाच आहे तर सांगतो कि गागाभट्ट व शिवराय काहि राज्यभिषेकाच्या निमित्तानेच एकत्र आले नव्हते. तर त्याच्याहि आधी बरीच वर्षे म्हणाजे निदान ८-१० वर्षे आधी शेणवी समाज्याच्या निवाड्यात गागाभट्ट शिवाजीराजे जो निर्णय देतील तो मान्य करावा. असे विधान करतात. आता गागाभट्टांसारखा वेदशास्त्रसंप्पन दशग्रंथी ब्राह्मण एका जातीच्या निवाड्यात राज्याभिषेका आधीच राजांना न्याय देण्यास सांगतो म्हणजे गागाभट्टांना शिवरायांचे कार्य व त्यांची निर्विवाद योग्यता आधीच माहित होती असे दिसते. दुसरी गोष्ट – राज्याभिषेक झाल्यावरच राजाला अथवा त्या क्षत्रियाला ब्राह्मणांच्या सामाजिक-धार्मिक अथवा कौटुंबिक प्रश्नात निर्णय देता येत असे. गागाभट्टांना जर महाराजांना फसवायचे होते तर त्यांना राज्यभिषेक करवलाच कसा? कारण त्यांना ब्राह्मणसमाजाचे वर्चस्व अबाधित ठेवायचे होते तर कितीहि दक्षीणा दिली तरी त्यांनी महाराजांना राजेपद द्यावयास संमती दिलेच नसती. आणि कोटी रुपये दक्षीणा अथवा यांच्याच भाषेत सांगायच तर “लाच” हि गागाभटांसाठि मोठी गोष्ट नव्हती. काशी क्षेत्रीचा वेदोमुर्ती म्हंटल्यावर पैसा-मानमरातब-प्रसिध्दि हे त्यांना अज्जिबात नविन नव्हतं. ती दक्षीणा मिळणारच होती. यांचा अजुन एक आक्षेप असतो की “माझ्या हातुन काहि प्रमाद घडल्यास अथवा मी माझी राजाची कर्तव्ये पार पाडण्यात कसुर केल्यास, राजगुरु माझ्या मस्तकावर धर्मदंडाचा प्रहार करुन मला पदच्युत करतील!” अशी शपथ महाराजांना घ्यायला लावली होती. इथे त्यांना बामनी कावा वाटतो, पण जर महाराजांना प्रजेचा निवाडा करण्याचा हक्क असेल तर राजावर देखिल एखादा अंकुश असलाच पाहिजे. मुळात धर्मसत्ता व राजसत्ता यांना एकमेकांचा धाक नसेल तर राज्य टिकत नाहि. गावचा पाटिल झाला म्ह्णुन गावच बुडवावा का? ते तसे होऊ नये म्हणुन गेली हजारो वर्षे भारतातच नव्हे तर जगभर राजसत्ता-धर्मसत्ता एकमेकांना धरुन असतात. याचा अर्थ राजा वाईट असतो म्हणून नव्हे तर आअपल्यावर जी जबाबदारी आहे ती आपण पार पाडतो अहोत की नाहि हे बघणारं कोणी असेल तर काम नीट होतं. इथे तर समाजाचा प्रश्न अहे. आणि एकट्या शिवरायांनाच नव्हे तर कुठल्याहि राजाला हि शप्पथ घ्यावीच लागायची.
दुसरा मुद्दा येतो समर्थ रामदासांचा. समर्थ रामदासांचे अध्यात्मिक कार्य प्रचंड आहे. ज्याकाळी दुष्काळ, कर्ज, रोगराई यांच्या बरोबरच सुलतानशाहिने जनता पिंजुन गेली होती तेव्हा जे संत जनतेला मानसिक आधार देऊन परमार्थाचा उपदेश करत होते त्यापैकिच एक रामदास स्वामी होते. पण सद्य कालात ते फक्त ब्राह्मण होते हा एक आणि एकच मुद्दा त्यांच्या कार्यावर पाणी फिरवण्यासाठी या संस्थांना पुरेसा आहे. रामदास आदिलशाचे हेर होते असे एकजण म्हणतो दुसरा तेच औरंगजेबाचे हेर होते असे म्हणतो. निदान आरोप करताना तरी एक काहितरी बोलावे?? पण मुळात आरोपच बिनबुडाचे असल्याने ह्यांची जीभ सैल सुटली आहे. इतकी कि समर्थांचे चारीत्र्य हनन करायला - आपल्या स्त्री शिष्यांबरोबर चाळे करणारा “रंडिबाज रामदास” असा गलिच्छ प्रचार हि मंडळी करीत आहेत. यांच्यातले काहि विकृत लोकं दुसरीकडे म्हणतात कि रामदास नपुंसक होते म्हणुनच त्यांनी लग्न केले नाहि आणि म्हणुनच ते मांडवातुन पळुन गेले होते. खरतर समर्थांचे कार्य किती मोठे आहे हे सर्वांनाच माहित आहे तरी त्याचे पुन: पुन: उच्चारण यासाठी करावे लागतेय कि आज गप्प बसलो तर यांच्या विकृत चाळ्यांना अजु चेव येईल. त्यामुळे हे झोपेचे सोंग घेतलेले जागे हॊणार नाहित हे माहिती असल्याने या बिनडोक लोकांकरीता नव्हे तर समाजाला यांचे ढोंगी बुरखे फाडुन दाखवण्यासाठी हा प्रपंच आहे. पुन्हा समर्थांबाबत सांगायचे झाले तर समर्थ जर शत्रुचे हेर असते अतवा भ्रष्ट चारीत्र्याचे असते तर सातार्यासारख्या अतिमहत्वाच्या टिकाणचा किल्ला महाराजांनी समर्थांना मठ बनवायला कशाला दिला असता? उलटपक्षी स्वराज्याच्या आसपासहि रामदासांना फिरकु दिले नसते. कींवा रामदास हिन चारीत्र्याचे असते तर महाराजांनी अश्या गुन्हेगारांचे हातपाय कलम करायचा कडक नियम बनवला होता. असे असताना राज्याभिषेका नंतर थोड्याच दिवसांनी समर्थ स्वत: प्रतापगडावर ठोसर घराण्याचा नवस फेडण्यासाठी येऊन गेल्याचा उल्लेख आहे. व त्यावेळी प्रतापगडाच्या किल्लेदारास समर्थांची योग्य ती काळजी घेतली जावी व त्यांना कसलहि कमी पडु देऊ नये अश्या आशयाचे पत्र महाराजांनी लिहिल्याचे समजते. तिच गोष्ट सज्जनगडाची. अजुन एक गंमतीचे गोष्ट “भिक्षा” हा रामदासींचा किंवा संन्याश्यांचा धर्म आहे. दासबोधात तर भिक्षेवर एक वेगळे प्रकरण रामदासांनी सांगितले आहे ते मुळातुन वाचण्यासारखे आहे. असो, तर “भिक्षा” या गोष्टिवरुन यांनी तुकाराम महाराज व रामदास यांना एकमेकांसमोर उभे केले आहे. पण याचा अर्थ यांची बुध्दी कमी तरी आहे किंवा हे मुद्दाम तसे करत आहेत. कारण रामदासंची भिक्षा व तुकारामांची भिक्षा यांत फरक आहे. तुकाराम भिक्षा हा शब्द “भिक” या अर्थाने वापरतात. तर समर्थ कोरड्या अन्नाची भिक्षा हा समाजाच्या प्रत्येक घरा पर्यंत जाण्याचा आणि देवकार्याचा प्रचार करण्याचे उत्तम साधन समजतात. बाकिचे जाऊदे ज्या बुध्दाचे हे लोक गोडवे गाताना ब्राह्मणांवर टिका करतात त्या बुध्दाने देखिल भिक्षा मागावी असेच सांगितले आहे. ह्या दोघांचे जर पटत नसते तर ते एकमेकांना भेटलेच नसते. तुकाराम महाराज व रामदास स्वामी एकमेकांना भेटल्याचा स्पष्ट उल्लेख आहे इतकेच नव्हे तर रामदासांनी तुकारामाची स्तुती करताना “धन्य धन्य तुका वाणी। धन्य धन्य तुझी वाणी।“ असे एक पद लिहिले आहे तर रामदासांनी जे अकरा मारुती थापन केले त्यापैकी एका मारुती साठी तुकारामांनी अभंग लिहिला आहे. या शिवाय शिवराय निधन पावल्यावर “शिवरायाचे आठवावे रुप। शिवरायाचा आठवावा प्रताप।“ हे पत्र त्यांनी शंभुराजांना लिहिलेच होते कि. खुद्द महाराजांना त्यांनी “श्रीमंत योगी” आणि “जाणता राजा” अशी योग्य पदवी देऊन एक दीर्घ पत्र लिहिले होते जे आज प्रत्येक मराठी माणसासाठी शिवरायांचे जिवंत शब्दचित्रच आहे.
आता आपण दादोजी कोंडदेवांबाबत बोलुया. यांचे म्हणणे आहे कि दादोजी शिवरायांचे गुरु नव्हते. ठिक आहे ते गुरु नव्हते असे मानले तरी म्हणुन दादोजींचे शिवरायांच्या आयुष्यातले स्थान कमी होत नाहि. शिवरायांनी पंतांना खुप आदराने वागविल्याचे अनेक पत्रावरुन समजते. जेम्स लेनने जे विकृत लिखाण केले ते केवळ कचर्यात टकण्याच्या लायकिचे आहे हे १००% सत्य. पण जेम्स लेनने जो विकृतपणा केला त्याचे सगळे दोष ते दादोजी कोंडदेवांचे चरीत्र आणि शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना देतात. मुळात अजुन एक गोष्ट समाजातील लाखो लोकांना माहित नाहि कि हे पुस्तक प्रकाशित होताच शिवराय-जिजाऊसाहेब आणि दादोजी कोंडदेव यांच्यावर जे अतिविकृत लिखाण लेनने केले त्याविरुध्द बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, मेहेंदळे या आणि अश्या जेष्ठ इतिहासकारांनी ऑक्सफर्ड प्रेसला पत्र लिहुन त्याविरुध्द निषेध नोंदवला होता आणि त्याचाच परीणाम म्हणजे ऑक्सफर्ड प्रेसने “आम्हि त्या पुस्तकाचे सर्क्युलेशन ताबडतोब थांबवले आहे!” असा उलट लेखी निरोप यांना कळवला होता. हे सगळे घडत असताना या बेशिस्त संस्थेचे नेते काय विड्या फुंकत बसले होते का? यांना जाग आली तोवर बाबासाहेबांनी कारवाई करुन बघा मी केले मी केले असे अवडंबर माजवले नाहि. तरी यांनी काहिहि जाणुन न घेता किंवा माहित असुनहि मुद्दामच भांडारकर फोडले कारण यांना काहितरी खुसपट काढायचेच होते ते त्यांना मिळाले त्यातुन शिवराय-जिजाऊसाहेब हा तर प्रत्येक मराठी माणासाचा मानबिंदु ! मग काय विचारता? भांडारकरच्या निमित्ताने बाबासाहेबांवर - ब्राह्मणांवर गरळ ओकायला सुरुवात झाली. सुदैवाने समाजातील ९८% लोकांनी बाबासाहेब असे करुच शकत नाहित असा सार्थ विश्वास बाबासाहेबांवर दाखवला. त्यामुळे यांची गोची झाली. यांनाकोणे विचारीनासे झाले. करायचं काय आपली चुल तर जळत राहिली पाहिजे त्यात इंधन काय? बाबासाहेब किती दिवस पुरणार? हा प्रश्न यांना पडला मग मराठा आरक्षणासाठी हे गाड्या जाळत सुटले. कुणबी मराठा एक आहेत मराठा समाजाला अरक्ष्ण द्या म्हणुन आंदोलने करु लागले. कुणबी समाजाने त्याला विरोध केल्यावर तर अजुनच चेकाळले आहेत. शिवाय उलटपक्षी बर्याच मोट्या मराठा समाजाचे आणि विशेषत: आजच्या तरुण पिढीचे म्हणणे आहे “कशाला हवेय आरक्षण? आमच्या मनगटात ताकद आहे, स्वत:ची विचार शक्ती आहे!” त्याने ह्यांच्या समोरचे प्रश्न अजुनच कठिण होत आहेत. तरी साप-साप म्हणु भुई धोपटण्याचे काम हे इमाने-एतबारे करीत आहेत. हीच ताकद त्यांनी समाज एकत्र कसा येईल याकरीता लावली तर महाराष्ट्राचे पर्यायाने देशाचे भले होईल.
छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलायच झालं तर त्यांच्याच नावाने हि ब्रिगेड सुरु आहे. आणि संभाजीराजांना बामनांनी त्रास दिला अशी हाकाटि देऊन समाजात गैर समज पसरवला जात आहे.
महाराजांना एकट्या ब्राह्मणांचाच त्रास झाला होता का? शंभुराजांना पकडुन देणारा गणोजी शिर्के कोण होता? आणि शंभुराजां बरोबर अखेरपर्यंत राहणारा कवी कलष कोण होता? हे बघा आधी. इथे कोणा एका जातीवर मला टिका करायची नाहिये पण एकट्या ब्राह्मणांनी हे केल नाहिये हे सांगताना काहि दाखले देण भाग आहे.
अजुन एक मुद्दा शिवराय काय किंवा शंभु राजे काय यांच्या विरुध्द अफझलखानाच्या अथवा औरंग्याच्या मागे कंबरेला शोभेच्या तलवारी लावुन, आणि अपल्या षंढ मिश्यांना पिळ भरत स्वराज्या विरुध्द उभे राहणारे कोण होते याची यादि बघा आधी. मग ठरवा कि बामणाने चुक केलीये कि या ब्रिगेडच्या पुर्वजांनी? एक मुरारजगदेव काय सापडला शहाजीराजां विरुध्द मोहिम लढणारा, हे भोसल्यांशी सात जन्माचे वैर सांगणार्या घोरपडे-सावंतांना विसरले? शहाजी राजांची अफझलने कॊणाच्या मदतीने धिंड काढली होती? हे सांगतात जसवंतसिंहाला स्वत: ब्राह्मणांनी सहस्त्रचंडि करायला मदत केली होती जेणे करुन शिवाजी राजाचे तळपट होईल आणि परत बामनांची सत्ता येईल म्हणुन, पण असे होम-हवन करुन कोणी जिंकत असतं तर महाराजांनी राजगड-रायगडावर राजसुर्य आणि अश्वमेधच करायला हवे होते ना? ब्राह्मण तिथेहि आले असते. हेच म्हणतात दक्षिणेच्या पैशावर हि फुकटि लोकं वाढतात म्हणुन. गागाभट्टाने घेतली होती १ कोट रुपये दक्षीणा वगैरे वगैरे.. मुळात आपण काय बोलत आहोत हेच यांना समजत नाहि. ब्राह्मणांनी जे चांगलं केलय त्या बद्दल हे हरामखोर लोक एक चकार शब्द काढत नाहित उलट झालच तर त्याचे अति विकृत लिखाण करतात.
ह्या लोकांना एकतर स्मृतीभ्रंशाचा त्रास आहे. मागे आपण काय बोललो होतो काय लिहिलं होत हे साफ विसरतात. एकदा म्हणातात अफझलखानाच्या नावाचा वापर करुन संघ-विहिंप हि लोकं मराठा(हिंदु पण नाहि बर का!) आणि मुस्लिम समाजातील दरी वाढवत आहेत, आणि नंतर मानसिक संतुलन बिघडल्यागत बरळतात कि अफझलखानाचा वकिल कृष्णाजी भास्कर या बामनाने महाराजांवर तलवार चालवली होती, आता समाजाला कृष्णाजी भास्कराच्या त्या क्रुष्णकृत्याचा विसर पडावा म्हणुन हे प्रतापगडावरील अफझलाच्या कबरीला विरोध करीत आहेत आणि अफझलखानाचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत वगैरे वगैरे. आता शेंबडे पोर तरी यावर विश्वास ठेवेल का? आधी सिद्दी जौहराला कोण मदत करत होतं त्यांची नावे बघा. फाजलखानाला जावळीच्या जंगलातुन वाट शोधायला कोणी मदत केली ते बघा. विशाळगडाला मोर्चे लावुन शिवरायांना अडवणारे कोण होते त्यांची नावे बघा दिसतोय एक तरी बामन?
टिळकांवर चिखलफेक करताना “फक्त भटमान्यच” असे विशेषण लावले जाते, बहुदा “लाल-बाल-पाल” ह्या त्रयीने काय घडविले होते हे यांना ठाऊक नसावे. बंगालमध्ये शिवजयंतीचा उत्सव टिळकांनीच सुरु केला होता. टिळकांना इंग्रजस सरकारने हवापालटासाठी मंडालेयात पाठवले नव्हते हे देखिल यांना माहित नसावे. टिळकांना ६ वर्षांची शिक्षा झाली तेव्हा लाखो गिरणी कामगारांनी मुंबईत ६ दिवसांचा संप केला होता जो भारतात इंग्रजां विरुध्द कामगारांनी केलेला “पहिला संप” होता. ते भटमान्य असते तर हे झाले असते का? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे सर्व भारताचे “तिलक महाराज” झाले बंगालचे “बडेदादा” झाले ते कसे? काहितरी आचरटागत लिहायच कि झालं??? यांनी भांडारकर फोडल्यावर जेव्हा यांच्या उपद्रवी कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडले होते तेव्हा एखाद्या दुकानदाराने दुकानाचे अर्धे शटर तरी खाली केले होते काय? आपण कोण आहोत? गल्लीच्या पलीकडे आपल्याला कोणी ओळखतो का? आपला पगार किती आपण बोलतो कीती? याचा विचार न करता फक्त बरळत रहायचं इतकच यांना येतं. हे शिवश्री खेडेकर सर, नरके सर अश्या थाटात लिहितात कि हे कोणा गुरुदेव रविंद्रनाथांबद्दल, लिओ टॉल्स्टॉय बद्दलक किंवा मार्क्स बद्दल सांगत असावेत.
स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्याबद् दल लिहिताना तर यांनी किळसवाणे लिहिले आहे. “संडासवीर सा(डि)वरकर” हि यांची भाषा आहे. सावरकरांनी जे जात्योच्छेदनाचे काम केलेय त्या बद्दल यांना काहिहि घेणे देणे नाहिये कारण ते फक्त ब्राह्मण होते. इतके तर हे कृतघ्न आहेत.
अजुन एक जहरी अपप्रचार यांच्याकडुन केला जातो कि शिवाजी महाराजांचे खरे शत्रु म्हणाजे ब्राह्मणच. शिवाय त्यांच्या वेबसाईटवर महाराज एका ब्राह्मणावर तलवार चालवुन त्याचे शीर उडवत आहेत असे दाखवण्यात येते. पण या मुर्खांच्या एक गोष्ट लक्षात येत नाहि या चित्राचा परीणाम म्हणजे ब्राह्मण महाराजांचे नव्हे तर महाराजच ब्राह्मणांचे शत्रु होते असा अत्यंत चुकिचा संदेश समाजात अपोआप पसरवला जातोय. महाराजांचे शत्रु जण ब्राह्मण असते तर महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात ६ ब्राह्मण कसे? अग्र्याहुन सुटका करुन घेताना नऊ वर्षाच्या आपल्या पोटच्या पोराला एका ब्राह्मण कुटुंबातच का ठेवले? आग्र्याहुन सुटका झाली तेव्हा पाठीमागे जे दोन ब्राह्मण फुलादखानाला मिळाले त्यांचे केवळ अमानुष हाल केल्यावरहि महाराज कसे निसटले या बाबत त्यांनी अवक्षरहि काढले नाहि. पुढे ते सुटुन आल्यावर महाराजांनी त्यांचा फार आपुलकिने सत्कार केला होता. संभाजीराजां बरोबर शेवटपर्यंत कोण होता? कवी कलशच ना? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातली “थोरली मसलत” म्हणजेच दिल्लीवरचा हक्क बाजीरावानेच प्रस्थापित केला ना?
इतकी विकृत विचारसरणी वापरताना ते दुसर्या बाजुला आपले म्हणणे मांडण्यासाठी शिवराय, संभाजीराजे, आंबेडकरांचे नाव घेतात हे अजुन क्लेषदायक आहे.

- टिकोजीराव!
Subscribe to:
Posts (Atom)